| |
मुलगा/मुलगी वयात आल्यानंतर प्रत्येक पालकाची आपल्या मुलाला/मुलीला
योग्य, अनुरूप जोडीदार मिळवा यासाठी धडपड चालू होते. मग अनेक वधू-वर
मंडळामध्ये नाव नोंदण्यात येते व सतत या मंडळामध्ये भेट देणे हा
दीनक्रम चालू होतो. आज अनेक मंडळे लग्न जमविण्याचे कार्य करीत आहेत.
कोणी समाजकार्य म्हणून तर कोणी उपजीविकेचे साधन म्हणून हे कार्य करीत
आहेत. इतर संस्थांसारखं ' प्रथम फॉर्म भरा, पैसे भरा, व
त्यानंतरच स्थळे पहा!' असे न म्हणता, मोफत
नोंदणी करा! व लग्न जमल्यानंतर आपल्या इच्छेनुसार
संघटनेला आर्थिक मदत करून समाजकार्याला हातभार लावा' अशी वृत्ती
बाळगून, समाजाभिमुख काम करण्याचा वसा घेतलेली, आमची एकमेव
समाज संघटना असल्याचा आम्हाला निश्चितच अभिमान
आहे. सभासदांना आपुलकीनं विचारणं, त्यांची आपलेपणानं चौकशी करुन त्यांना
तशी सेवा देणं यांत आमची समाज संघटना कुठेच मागे
नाही.
आज समाजातील
लोकांना घर बसल्याबसल्या समाजातील अनेक स्थळे बघता यावी हाच या
संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे. यासाठीच ऑन लाईन तसेच ऑफलाईन सुविधा
येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑन लाईन सुविधेमध्ये आपल्याला
कोणाच्याही माध्यमाशिवाय सरळसरळ आपली माहिती भरता येईल. ही माहिती
पडताळून आपली माहिती सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
तसेच सर्वांना एकमेकांशी संपर्क करण्याची सुविधा ही करून देण्यात आली
आहे. अनेकजण ऑन लाईन माहिती देण्याबाबत उत्सुक नसल्याचे दिसल्यामुळे ही
सुविधा ऑफलाईन उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये संघटनेच्या कार्यालयात
ज्या समाजबांधवांनी आपल्या पाल्याचे नाव नोंदवलेले असेल त्यांची माहिती
येथे देण्यात येईल. स्थळांची माहिती ई-मेलद्वारे ही देण्यात येईल॰ |
|