spacer

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ

spacer
spacer

गाबीत समाजाचा इतिहास

 

संदर्भ:  
  पुस्तकाचे नाव: कोकणचा सांस्कृतिक इतिहास
  लेखक: डॉ. भालचंद्र आकलेकर (एम.ए.एम.कॉम. पीएच.डी.डी.लिट)
  प्रकाशक: नवभारत प्रकाशन संस्था, गिरगाव

गाबीत हा समाज कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आढळतो. कोळी जममत ही वेगळी जमात आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे. गाबीत ही स्वतंत्र जात आहे. गाबीत जात इ.स. 1964 मध्ये वा त्यापूर्वी गाबीत या नावाने अस्तित्व होती असे सांगण्यास पुरावा उपलब्ध नाही. मात्र त्यापूर्वी ही गाबीत समाजाचे अस्तित्व होते. राजपूत मराठा जातीपासून तुटून पडलेली अनेक घराणी गाबीत व या जाती नावाने ओळखली जात आहे. मराठ्यांचे आरमार नष्ट होईपर्यंत गाबीत शब्दाला विलक्षण प्रतिष्ठा होती. त्यानंतर त्याचे राहणीमान घसरत गेले.

गाबीत या क्षत्रिय आरमार घराण्याची वस्ती प्रामुख्याने किल्ला, समुद्र आणि खाडीच्या आसर्‍याने झालेली आढळते. रत्नागिरी किल्ला, जुवे जैतापूर, विजयदुर्ग, देवगड किल्ला, तारामुंबरी, मीठ मुंबरी, आचरे, सर्जेकोट, वेंगुर्ले, उभादांडा, शिरोडा, आरोंदा, केरा, तेरेखोल या ठीकाणच्या त्याच्या वसाहती प्रसिध्द आहेत.

उकड्या तांदळाचा भात,माशाची कढी (आमटी-निस्त्याक) जोंधळ्याची वा तांदळाची भाकरी हे मुख्य अन्न, सकाळचा चहा क्वचित, परंतु उकड्या तांदळाची पेज असते. शेवग्याच्या शेंगाची भाजी, चवळी, कुळीथ, पावटे असली कडधान्ये अधूनमधून वापरतात. नाचणीच्या शेवया, तांदळाच्या पिठाचे घावने, सणासुदीला कोंबड्याची सागुती वडे किंवा आंबोळया, पाहुणे सोयर्‍यासाठी खास स्वयंपाक असतो. दारू पिण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात आढळते. व्यसनाधिंनतेचे प्रमाण बरेच कमी आढळते.

पुरुष पंचा धोतर नेसतात. अंगात बर्‍याचा वेळा काही नसते. खांद्याला-डोक्याला टॉवेल बाहेर वा शहरात जाताना सदरा, शर्ट, टोपी घालतात. केसाला तेल चोपून भांग पाडण्याची सवय.

स्त्रिया नऊवारी लुगडे, चोळी मुली परकर-पोलके घालतात. अलीकडे वाचवारी साडी, स्कर्ट व पंजाबी ड्रेस ही घातला जातो. कपाळाला ठळक कुंकू जुन्या बायका रेखीव चीरी अजूनही काढतात. शृंगाराचे वळेसर व आबोलीचे सैल आंगडाभर घालण्याची हौस. पायात चांदीची जोडणी वेढणे घालतात. सोन्याच्या दागदागिन्यांची आवड.

गाबीत पुरुष काटक मजबूत बांध्याचा, असेल त्या परिस्थितीत समाधान मानणारा आहे. सतत कष्ट करणारा, पराक्रमी, स्वाभिमानी व एकमेकांवर विश्वास ठेवणारा, अडीअडचणींना धावून जाण्याची वृत्ती त्यांच्यात आहे.

स्त्रिया सौजन्यशील, कुळवंत, वर्णाने गोर्‍या सावळ्या, अंगाने मजबूत थोड्याशा भांडखोर, घराचा सारा राबता पहाणार्‍या, श्रद्धाळु देवधर्म पाळणार्‍या असतात. अलीकडे शिक्षणात आघाडीवर असतात.

सगोत्र विवाह काही घराण्यात वर्ज्य मानला जातो. एकाच कुळात लग्न संस्कार केला जात नाही. देवघरात देवक ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न कार्यात देवकाची पूजा होते. मामाच्या मुलीशी लग्न होते. पण आते बहिणीशी लग्न वर्ज्य मानले जाते. लग्नाची मागणी वरपक्षाकडून किंवा वधू पक्षाकडूनही करण्यात येते. वधू पक्षाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यास लग्न खर्चासाठी काही रक्कम वधूपक्षाला देज देण्याची प्रथा पूर्वी होती. साखरपुडा व लग्नाचे विधी सर्व कामे ब्राम्ह्णाकडुन केली जातात. लग्नाच्या दिवशी संस्कार गाणे म्हणतात. विधवा पुनर्विवाहाची प्रथा अल्प प्रमाणात आहे. प्रेत दहन करण्याची प्रथा आहे.

गाबीत जात हिंदू धर्माचे पालन करतात. अनेकजण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. पंढरीची आषाढी, कार्तिकी वारी होते. काही घराण्यात रामदासी पंथाची उपासना चालते.गुरु घेण्याची पध्दत आहे. कोकणात जाऊन (गुरु जोगी नाथ पंथांची) गुरु दीक्षा घेण्यात येते.

गाबीत समाज

- Dynamic Drive provides free, cut and paste DHTML scripts

 

समाजविषयक माहिती

समाज इतिहास
समाजातील आडनावे
नामांकित व्यक्ती
समाजातील उद्योजक
सण व उत्सव
विचार / लेख
शासकीय निर्णय
समाजकार्ये
समाज अहवाल
आयोगाचा अहवाल
वधू-वर सूचक केंद्र
प्रतिक्रिया
समाजातील आडनावे

      
कोयंडे कुलवंश
लेखक : श्री राम कोयंडे
 
 
 
 
  

जाहिरातीसाठी राखीव